मी हा लेख जरा उशीरानेच वाचला. मला तरी सगळा पोटशूळ वाटला नाही. चांगले आणि वाईट दोन्ही मुद्दे मांडलेले आहेत असे वाटते. उदा० खालील काही मुद्द्यांमध्ये तथ्य दिसते.

... ... भारतीयांचे देशी सरकारविषयी किंवा त्याच्या धोरणांविषयी फारसे चांगले मत नसते. क्वचित त्यांच्या तोंडून कुचेष्टेचेच उद्गार निघत असतात. बर्‍याचदा ते सरकारच्या अकलेविषयी आत्यंतिक त्वेषाने बोलतात, तेव्हा आपल्याच हाडामांसाच्या आणि रक्ताच्या नागरिकांनी हे सरकार निवडून दिलेले आहे, याचा विसर पडलेला असतो. अमेरिकेपेक्षा भारतीय लोकशाही अधिक भक्कम आहे, हेही मग त्यांना कुणीतरी सांगावे लागते. ही चर्चाही त्यांच्यावर बर्‍याचदा लादली जाते, ती त्यांना भारतीय दूतावासात मिळणार्‍या वागणुकीमुळे. अमेरिकाच काय, पण बहुतेक देशांत असणार्‍या भारतीय दूतावासांमध्ये काम करणार्‍या आणि एका अर्थाने शंभर टकके भारतीय असणार्‍या अधिकार्‍यांविषयी या प्रवासी भारतीयांमध्ये तर घॄणाच असते. यापैकी काही वकिलातींमध्ये तर भारतीयांविषयी वर्णद्वेषाचेच वातावरण आढळते. गोर्‍या कातडीपुढे कंबरेत वाकून उभे राहणारे, मूळच्या भारतीयांना मात्र दुरुत्तरे देतात. त्यामुळे परदेशस्थ भारतीयांनाही नकोच त्या वाटेने जायला, असे होऊन जाते!

अनिवासी भारतीय म्हणजे या देशाची परदेशांमध्ये असणारी ठेव आहे. फार तर आपण त्याला मुदत ठेव म्हणू, कारण त्यावर या देशाला बर्‍यापैकी व्याजही मिळते. त्यांनी भरणा केलेल्या पैशामुळेच या देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला बर्‍यापैकी आकार आला आहे. ... ...

चमत्कारिक वाक्यरचनेमुळे कोणाची बाजू घेतली जात आहे ते चटकन उलगडत नाही, असे मला वाटते.