डावखोऱ्या लोकांना ते ऍबनॉर्मल आहेत असे दाखवून त्यांना बळेच उजव्या हाताने लिहायला लावण्याचे प्रयत्न आपल्याकडे बरेच घडतात.
खरं आहे. असे प्रयत्न माझ्या बाबतीत अगदी जोरदार झाले होते, म्हणून मी उजव्या हाताला जेवणे आणि लिहिणे ही कामे वाहिली आहेत, नसता 'उजव्या हाताची कैफियत' मांडायला माझ्या उजव्या हाताने कमी केले नसते ! उजव्या हाताने काम करायला भरीस पाडण्याचे प्रयत्न माझ्या भाच्याबद्दल त्याप्रमाणात झाले नाहीत, ह्याचा मला अतिशय आनंद आहे.
अवांतर - 'उजवणे' हा शब्द 'उजवा' शब्दावरून आला असावा का?