भाषराव,

मीराताईंनी स्वतंत्र लिहिला असेल (त्यांची तशी क्षमता आहे अशी माझी खात्री आहेच) तर ते खूपच कौतुकास्पद आहे.

लाल अक्षरात लिहिलेले शब्द वाचून फार बरं वाटलं. त्याबद्दल आभार.

लेखाच्या सुरुवातीला  लिहिल्याप्रमाणे ह्या लेखनाची idea भोमेकाकांच्या प्रतिसादातून आली. ते प्रतिसाद म्हणूनच लिहावे असे एकदा वाटले पण मग मूळ चर्चेच्या दृष्टीने फारच विषयांतर झाले असते म्हणून लेख ह्या रूपात लिहिले.

अनंत काणेकरांचा तुम्ही म्हणत आहात तो लघुनिबंध मला आठवत नाही. त्यांचा शून्यासंबंधीचा एक लघुनिबंध, तसेच 'आळस आणि उद्योग' हा लघुनिबंध हे आठवतायत. त्यांच्या लघुनिबंधात आणि माझ्या ह्या लेखात मुद्यांव्यतिरिक्त इतर साम्य असेल असे वाटत नाही आणि मुद्दे आपल्यापैकी कोणालाही सुचण्यासारखे आहेत. वेदश्री म्हणते तसे या विषयावर बरेच लेखन झालेले असेल/आहे.  मी त्यापैकी कोणतेही वाचलेले नाही. माझ्या लिखाणात आणि काणेकरांच्या लिखाणात मुख्य फरक हा की काणेकरांनी अतिशय खुमासदार शैलीत हे लिहिले असेल.  शैलीच्या बाबतीत मी नक्कीच डावी आहे! (तो लघुनिबंध वाचायला मिळाला तर फारच बरे.) असो.

मी हे स्वतंत्रपणेच लिहिले आहे. म्हणून तुमच्या कौतुकाचा आनंदाने स्वीकार करत आहे.

मीराताई