डाव्यांचे मनोगत आवडले. भारतात डावखोऱ्या व्यक्ती कमी प्रमाणात आढळण्याचे कारण मुळात डावखोऱ्या असणाऱ्या व्यक्तींना लहानपणापासूनच उजव्या हाताने कामे करण्याची केलेली सक्ती. डाव्याचा आणु अशुभाचा जोडलेला संबंध मात्र कधी पटला नाही. उजव्या हाताने कामे करण्यारी मंडळी डावखोऱ्यांच्या तुलनेत अधिक असल्याने उजव्या हातामध्ये जास्त सफाई असते, त्यामुळे एक्झाद्या गोष्टीमध्ये चांगलीला उजवी आणि तुलनेने कमी चांगलीला डावी म्हणणे एकवेळ पटू शकते, मात्र शुभाशुभ पटत नाही.
लेख मस्त आहे. ह्या विषयावर इतर लेखन मीही वाचलेले नाही. त्यामुळे तुलना झालीच नाही.