चारही भाग वाचले. चांगली माहिती देत आहात. माझ्या माहितीनुसार ८०/१२० हा सामान्य नव्हे तर सरासरी रक्तदाब आहे. म्हणजेच अनेक व्यक्तींचा रक्तदाब मोजून त्याची सरासरी काढल्यावर हे आकडे मिळतात. त्यामुळे ह्या आकड्यांपेक्षा थोडा कमी वा जास्त रक्तदाब हा सामान्यच (normal ह्या अर्थी) म्हणायला हवा, असे माझ्या एका डॉक्टर भावाने सांगितल्याचे आठवते. माझा स्वतःचा रक्तदाब हा नेहमी ७०/१०० असतो, पण म्हणून मी कमी रक्तदाबाची रुग्ण ठरत नाही असेही त्याने सांगितल्याचे आठवते. ७०/१०० रक्तदाब हा सरासरीपेक्षा कमी असला तरी माझ्यासाठी नॉर्मल आहे, तसा ९०/१३० हा काही लोकांसाठी (तो नेहमीच तसा असल्यास) नॉर्मल रक्तदाब असू शकतो असे वाटते. तुमचे काय मत?

लेखांमधील काही अवघड मराठी वा हिंदी शब्दांसाठी दुसरे शब्द वापरल्यास लेख सोपे होतील असे वाटते. उदाहरणार्थ निकास ऐवजी निचरा, प्रत्यास्थ ऐवजी लवचिक, डोळ्यांच्या रक्तपुरवठ्यास क्षती पोहोचून ऐवजी डोळ्यांना कमी प्रमाणात रक्तपुरवठा होऊन, वा डोळ्यांना होणाऱ्या रक्तपुरवठ्याचे प्रमाण घटल्यामुळे.