माफी अभिप्रायार्थ धन्यवाद.
अभिजीत, अभिप्रायार्थ धन्यवाद. हे लेख ही माझीच अभिव्यक्ती आहे. इथे व्यक्त झालेली माहीती ही कुठल्याही पुस्तकाचे आधारे लिहावी असे प्रयोजन नाही. त्याकरता ती पुस्तके मुळातच वाचणे चांगले. तुम्ही म्हणता ती पुस्तके मी माझ्या माहितीकरता अवश्य वाचेन.
वरदादेवी, अभिप्रायार्थ धन्यवाद. आपल्या प्रगल्भ सूचनांचे सदैव स्वागतच आहे. आपण म्हणता ते रक्तदाबाबाबत खरेच आहे. मात्र, अलीकडे वैद्यकीय व्यवसायातीलच लोक १४०/१०० सारख्या रक्तदाबासही 'तो तुमचा नेहमीचाच रक्तदाब' असू शकेल असे म्हटत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तो सावधानीचा इशारा दिलेला आहे.
श्रेयअव्हेरः हे लेख वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाहीत. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये.
काही अवघड मराठी वा हिंदी शब्दांसाठी दुसरे शब्द वापरल्यास लेख सोपे होतील असे वाटते. उदाहरणार्थ निकास ऐवजी निचरा, प्रत्यास्थ ऐवजी लवचिक, डोळ्यांच्या रक्तपुरवठ्यास क्षती पोहोचून ऐवजी डोळ्यांना कमी प्रमाणात रक्तपुरवठा होऊन, वा डोळ्यांना होणाऱ्या रक्तपुरवठ्याचे प्रमाण घटल्यामुळे.
ह्या आपल्या सूचना मान्य आहेत. शक्यतोवर त्यानुरूप लिहेन.