मृण्मयी,
मानसशी मी सहमत आहे.
१)मतला अजून चांगला होऊ शकेल.
उमलण्याचे नितनवे जोहार होते
विशेषतः'जोहार' च्या संदर्भात अर्थ स्पष्ट नाही.
२) दुसरा शेर असा लिहिला तर ?
बोलली उद्विग्न सुमने विखुरलेली
"शेवटी कोणीतरी खुडणार होते"
३) वेचते ज्यातून मी थोडा जिव्हाळा
ते सुखाचे रोकडे व्यवहार होते
यात (जिव्हाळा 'ओला' म्हणून) 'कोरडे व्यवहार होते" चालू शकेल.अर्थातच 'रोकडे' मधला जो विशिष्ट अर्थ आहे तोच अभिप्रेत नसल्यास!
४) आज मुजऱ्याचा कसा बेरंग झाला
पाहणारे रोजचे दिलदार होते
यात 'पाहणारे रोजचेच दिलदार होते' हे अधिक योग्य असले तरी मात्रांत बसत नाही म्हणून 'पाहणारे कालचे दिलदार होते' म्हटल्यास 'आज मुजऱ्याचा कसा बेरंग झाला' अधिक सार्थ होते.
५) इतर शेरही आवडले.
'गज़ल'च्या बाबतीत मीही 'नवलिखाच' आहे म्हणून मानस६ इतका अधिकाराने मोठा नाही पण माझे विचार मांडत आहे. उत्तर द्यावे.
जयन्ता५२