प्रत्येक सरकारी विभाग हा केतकरांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याच हाडामासाच्या लोकांनी निवडून दिलेल्या सरकारने चालवलेला आहे म्हणून त्यावर टीका करायचा कुणाला हक्क नाही. परदेशी भारतीयांना तर नाहीच नाही. हे अत्यंत तर्कदुष्ट विचार दाखवते. परदेशी भारतीयांनी अनेक स्थानिक सरकारी विभाग पाहिलेले असतात. मग ते कारचा लायसेंस बनवायचे ऑफ़िस असो, पोस्ट ऑफ़िस असो वा वीजेचे ऑफ़िस. तिथे किती सुविधा आहेत, कामे कशी द्रुतगतीने होतात, कित्येकदा ऑफिसमधे न जाताच होतात हे बघितल्यावर तसे आपल्याकडे असावे ही अपेक्षा गैर कशी?
केतकरांना परदेशी भारतीयांनी सरकारवर केलेली टीका जास्तच वर्मी लागते कारण त्यांना ह्या जमातीविषयी पराकोटीचा तिरस्कार आहे असेच मला वाटते. तरी एक बरे. ज्या सोनियाची केतकर थुंकी झेलतात त्या देवीतुल्य महात्मिनीच्या सरकारनेच दुहेरी नागरिकत्वावर शेवटचे शिक्का मोर्तब केले.  नाहीतर तोंडाला फेस येईपर्यंत भाजपच्या सरकारला शिवीगाळ केलि असती. असो. कोळसा उगाळावा तितका काळाच.