गोळे साहेब, तुम्ही सांगितलीत तश्या प्रकारे मी माझी श्वसनक्षमता मोजली. ९ आणि १० च्या आसपास आहे. माझे वय सध्या ३० आहे. मी योगासने बऱ्यापैकी नियमित करतो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या छातीचा पिंजरा आता पूर्णपणे तयार झाला आहे. पण मी जर व्यायामांनी तो वाढवण्याचा प्रयत्न केला तर वाढण्याची शक्यता किती आहे? अशा व्यायामांनी श्वसनक्षमता वाढेल असे मला वाटते. पण माझा हा अंदाज खरा आहे काय?

श्वसनक्षमता ३० वर्षानंतर वाढते का?