बाळूभाऊ, नमस्कार,

श्वसनक्षमता निरंतर वाढतच राहते. तिची अंतीम मर्यादा बहुधा कुणीच गाठत नाहीत. सामान्यतः आपण आपल्या शक्यकोटीतील श्वसनक्षमतेच्या १०-१५ टक्केच क्षमता श्वसनासाठी वापरत असतो. जे उर्वरित ८५-९० टक्के क्षमतेचा प्रभावी वापर करू शकतात ते निरोगी, दीर्घायुष्याचे वरदान मिळवतात.

शरीर ही ईश्वराची सर्वांगसुंदर रचना आहे. आपल्याला कल्पनाही नसते एवढ्या क्षमता त्याच्यात कायमच अंगभूत असतात. म्हणूनच जीवघेण्या आजारांनंतरही लोक पूर्णतः सामान्य जीवन जगू शकतात.