नमस्कार चोखंदळ वाचक महोदय,

हे असले म्हणजे कसे? मी काही वावगे लिहीत आहे का?

तुम्ही खरोखरच धडधाकट असाल तर तुम्हाला घाबरायला का व्हावे?

'खाई त्याला खवखवे' म्हणतात त्याप्रमाणे जर तुम्ही शरीरास न सोसणारे पदार्थ यथेच्छ हादडत असाल आणि त्याचा अर्थ तुम्ही धडधाकट आहात असा काढत असाल तर मात्र सुप्त संहारकाची तुम्ही वाट पाहत आहात. आणि खरेच जर तसे असेल तर ह्या लेखांचा तुम्हालाच खरा उपयोग आहे असे म्हणावे लागेल. तसे असू नये.

तुम्हाला उत्तम आयुरारोग्य लाभो आणि ह्या असल्या लेखांची गरज अजिबात न पडो हीच सदिच्छा!