संग्राह्य संग्रहव्य(?) संग्रहणीय अशी तीनही कर्मणि विध्यर्थ धातुसाधित विशेषणरूपे (किंचित वेगवेगळ्या अर्थाने) शक्य आहेत. पैकी पहिल्या रूपाने तसे करणे शक्य व्हावे असे, दुसऱ्या रूपाने तसे करणे आपले कर्तव्य ठरावे आणि तिसऱ्या रूपाने तशी शिफारस केली आहे असे काहीसे अर्थ होतात. (कृत्य, कर्तव्य, करणीय, किंवा खाद्य, खादव्य, खादनीय ... असे काहीसे) असे असले तरी संग्रहणीय पेक्षा संग्राह्य शब्द मराठीत जास्त वापरात आहे.
कदाचित संग्रहणी नावाचा एक (पोटाचा?) विकार असल्याने संग्रहणीय म्हणावयास नकोसे वाटत असावे.
(संस्कृत व्याकरणाच्या माझ्या मुळातल्या तुटपुंज्या ज्ञानाचेही बरेच विस्मरण झालेले आहे, कृ. चू.भू.द्या.घ्या.)