गोळे साहेब, हृदयधमनीरुंदीकरण अथवा हृदयधमनीउल्लंघन या बाबतीत काही प्रश्न आहेत...

१. हृदयधमनीरुंदीकरण अथवा हृदयधमनीउल्लंघन या प्रक्रियेनंतर रुग्णाला कायमस्वरुपी गोळ्या-औषधांना चिकटून रहावे लागते असे ऐकून आहे. तसेच त्यानंतर व्यायाम, धावपळ जास्त करणे उचित नाही असे सुद्धा ऐकून आहे. ते कितपत खरे आहे?
२. हृदयधमनीरुंदीकरण अथवा हृदयधमनीउल्लंघन या उपायांची गरज नाही असा दावा काही भारतीय वैद्यकीय संशोधक करत आहेत. त्यापैकी मला माहित असलेले म्हणजे पुण्याचे एक होमिओपॅथिक संशोधन केंद्र (नाव आठवत नाही) तसेच ठाण्याचे प्रतिक्षा नामजोशी यांचे केंद्र. प्रतिक्षा नामजोशी यांना तर सर्वोत्कृष्ट भारतीय महिला उद्योजकतेचा पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच आमच्या नात्यातल्या एकाला तिथल्या उपचारांनी खूप चांगला गूण आला आहे. त्यांना हृदयधमनीरुंदीकरण करायचा सल्ला दिलेला होता. आता ते अगदी ठणठणीत आहेत. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागत नाहीत. केवळ नियमीत प्राणायाम करावा लागतो. असे असेल तर मग त्या महागड्या प्रक्रिया लोक का करतात?