बाळूभाऊ,

१. हृदयधमनीरुंदीकरण अथवा हृदयधमनीउल्लंघन या शस्त्रक्रियांनंतर रुग्णाला कायमस्वरुपी गोळ्या-औषधांना चिकटून रहावे लागते हे खरे आहे. मात्र त्यातील बव्हंशी गोळ्या 'सम्यक जीवनशैली परिवर्तनाच्या' आधारे वर्षभरातच कमी करता येतात. तसेच त्यानंतर व्यायाम करणे आवश्यकच ठरते. पण क्षमतेबाहेर धावपळ जास्त करणे उचित नाही. हे खरे आहे.
२. हृदयधमनीरुंदीकरण अथवा हृदयधमनीउल्लंघन या उपायांची साध्या साध्या प्रकरणांमध्ये गरज नाही असा दावा प्रतीक्षा नामजोशी करीत आहेत. तो खरा आहे. त्यांना यावर्षीचा सर्वोत्कृष्ट भारतीय महिला उद्योजकतेचा पुरस्कारही अर्थमंत्री चिदंबरम् यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. आजच त्यांचा सह्याद्री वाहिनीवरचा 'फोन इन' कार्यक्रमदेखील पाहण्यात आला. आपणही बघितलाच असेल. 
३. असे असेल तर मग त्या महागड्या प्रक्रिया लोक का करतात? एक तर अज्ञान. दुसरे म्हणजे अविश्वास. तिसरे म्हणजे सामान्य ज्ञानाची कमी. तेच सामान्य ज्ञान वाढविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.