बाळू,
वृत्तात सगळी बोंबाबोंब असल्याने कधी-कधी फायदा देखी होतो तो असा. नाहीतर मला सुद्धा मानस आणि जयंता सारख्या चुका/उणीवा दिसल्या असत्या. अज्ञानात आनंद!
मृण्मयीच्या चुका/उणीवा दाखविण्याचा उद्देश नाहीच. जे लिहिले आहे ते 'समीक्षा' नाही फार तर सूचना किंवा शन्का-निरसन म्हणा.गझललेखकांमध्ये अशा मनमोकळ्या चर्चा नविन नाहीत व आवश्यक आहेत. गझलकाराने एखादा शब्द्प्रयोग का केला आहे हे जाणून घेणे गझल रसास्वादासाठी फार जरूरीचे असते.अशा चर्चेतूनच गझलकार व रसिकहि 'घडत' असतात. याचा फायदा इतर लेखकांनाही होतो. मी स्वतः माझी गझल जाणकारांकडून तपासून घेतो.
आपणही आमच्या प्रतिसादांकडे त्याच 'नजरेने' बघावे.
कळावे. क्षोभ नसावा.
जयन्ता५२