रोखे बाजार सभासद (Members) -

रोखे बाजारात व्यक्तींना परस्पर खरेदी विक्री करता येत नाही. ती त्यांना रोखेबाजारावर नोंदणी करण्यात आलेल्या अधिकृत सभासदांच्या मार्फतच करावी लागते. अश्या सभासदांना काही निकष पूर्ण केल्यासच त्यांना व्यवहार करण्याची अधिकृती मिळते.         अश्या सभासदांचे प्रकार पुढील प्रमाणे

 १)दलाल (Brokers)- हे आपल्या ग्राहकांच्यावतीने शेअर्सची खरेदी विक्री करतात. दलाल हे तेजीवाले किंवा मंदीवाले असतात.

 २)जॉबर्स (Jobbers)- जॉबर्सना ग्राहकांच्या वतीने खरेदी विक्रीची संमती नसते. ते दलालांशी व्यवहार करून आपला नफा कमावतात. मात्र, ते शेअर्सच्या खरेदी विक्री किंमतींत अल्पश्या फरकावर सुद्धा व्यवहार करतात.

३)डीलर्स(Dealers) - डीलर्स शेअर्सच्या खरेदी विक्री किमतीतील मोठ्या फरकावर व्यवहार करतात. त्यासाठी शेअर्सना जास्तीची वाढीव किंमत येईपर्यंत ते शेअर्स विकत नाही.

 ४) तराणीवाले - मुंबई रोखे बाजारातील जे सभासद ग्राहकांच्या वतीने दलाल म्हणून तसेच जॉबर्स म्हणून कार्य करतात. त्यांना तराणीवाले असे म्हणतात.

रोखे बाजारात काम करणाऱ्या दलालांचे पुढील चार प्रकार आहेत.

१)तेजीवाले दलाल (Bulls)- हे आशावादी दलाल असतात. हे दलाल भविष्यात शेअर्सच्या किंमती वाढून फायदा मिळेल या अपेक्षेने खरेदी- विक्री करतात .

२) मंदीवाले दलाल (Bear)- हे निराशावादी दलाल असतात. हे दलाल भविष्यात शेअर्सच्या किंमती घसरतील या भावनेने शेअर्सची खरेदी- विक्री करतात.

३)स्टॅग दलाल (Stag)- हा दलाल नवीन कंपन्यांचे शेअर्स प्राप्त करण्यासाठी कंपनी कडे अर्ज करतो. शेअर्स त्याला देण्यात आल्यास (Allotment) ते अधिमुल्याने (Premium)विकण्याची त्याची अपेक्षा असते. त्यामुळे तो अश्या शेअर्सची मागणी करतो. ज्यांची मागणी जास्त आहे व ज्यांच्यावर अधिक अधिमुल्य आकारले जाण्याची शक्यता असते. अलॉटमेंट मनी भरण्याची सूचना कंपनीकडून येण्याच्या आतच तो शेअर्स विकतो.

४) लेम डेक दलाल (Lame Duck)- मंदीवाला दलाल त्याचे वायदे पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यास त्याला लेम डेक असे म्हणतात.

 नीलकांत