माझ्या त्रोटक माहितीप्रमाणे 'आळंदी' या नावाची दोन गावे आहेत - एक 'देवाची आळंदी' (ज्ञानेश्वरांची) व दुसरी 'चोराची आळंदी'. त्यामुळे मृण्मयीताईंच्या 'चोराची आळंदी' या शब्दप्रयोगात मला तरी काही गैर दिसत नाही. (किंबहुना तसा शब्दप्रयोग रूढ आहे.)

याउपर, (देवाची) आळंदी आणखीही एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, हे आपणास कदाचित ठाऊक नसावे. 'आळंदीला जाऊन लग्न करणे' या प्रकाराबाबत आपण ऐकले नाही, असे दिसते. ('तज्ज्ञां'नी कृपया दुर्वासमुनींना खुलासा करावाच!)

- टग्या.