शिक्षणाचा आणि वैयक्तिक विकासाचा संबंध आहे असे वाटते. राजकारणात प्रवेश करण्यासाठी, अथवा निदान खासदार मंत्री असली पदे भूषवण्यासाठी किमान शिक्षणाची मर्यादा असावी असे वाटते. ही शैक्षणिक मर्यादा अगदी 'आय आय टी' पदवीधरच पाहिजे अशी नसली तरी जर उमेदवार आय आय टी सारख्या संस्थेतून उच्चशिक्षित असेल तर नक्कीच कौतुकास्पद आहे.
चौथी नापास व्यक्ती सुद्धा व्यवहारात आय आय टी पदवीधर माणसाइतकी हुशार असू शकते परंतू त्याला अपवाद मानले जाते. सामान्यीकरण (जनरलायझेशन) केले असता उच्चवीद्याविभूषीत व्यक्ती अश्या पदांसाठी कार्यक्षम ठरण्याची संभावना(प्रॉबॅबीलीटी) जास्त आहे.