केवळ साहित्यच नव्हे तर इतर कोणत्याही विषयावर लिहिलेल्या लेखांचे मनोगतावर स्वागतच आहे.
काही विषय असे असु शकतील -
योगा,
सर्वसाधारण आजार व ते टाळण्याचे उपाय,
कायद्याबद्दल माहिती,
घर बांधण्याबद्दल माहिती.
असे अनेक प्रकारचे अनेक विषयांवर लिखाण होऊ शकते, त्यासाठी अनेक क्षेत्रांतली मंडळी मनोगतावर यायला हवीत. (आणि आधीच असतील तर त्यांनी लिहिते व्हायला हवे.)
 
आता तुमच्या लेखमालेबद्दल - मी प्रतिसाद उशीरा देतोय, पण मी तुमचे सगळे लेख वाचले, ते खरोखरीच संग्रहणीय आहेत.
 
आणखी येऊंद्या,
एक_वात्रट