उर्दूमध्ये ज़ुआदचा उच्चार 'ज़' असाच होतो. 'ज़ुआद' चा उच्चार अरबीमध्ये 'द' आणि 'ज़' च्या मध्ये कुठेतरी असावा.

हा अरबी 'ज़ुआद' किंवा  'ज़्वाद'(ض) 'रमज़ान' आणि 'हौज़' आणि 'फैज़' ह्या उर्दू शब्दांत आहे.

उर्दूत केवळ एकच 'ज़' आहे. 'ज़े', 'झ़े'(बाज़ारमधला) 'ज़ुआद', 'ज़ाल' या सगळ्यांचा उच्चार 'ज़' असाच करावा, असे विद्वानांचे ठासून सांगणे असते.


पण काही अरबी विद्वान, मुल्लामौलवी मूळ अरबी उच्चार करून स्वत:चे अरबीचे ज्ञान अकारण पाजळत असतात.

 अरबीत 'रमज़ान'चा उच्चार रमदान  असा होतो आणि 'हौज़'चा उच्चार 'हौद'.  मराठीने हा 'हौद' काहीही बदल न करता स्वीकारला आहे.

चित्तरंजन