मी अमेरिकेत रहातो आणि उत्सुकतेपोटी मी नुकताच उर्दू वाचायला शिकलो. लायब्ररीतून एक उर्दू इंग्रजीतून शिकवणारे पुस्तक मिळाले त्यातून शिकलो. त्यावेळी अनेकदा असे वाटले की उर्दू लिपी देवनागरी हिंदीतून शिकायला कितीतरी सोपी गेली असती.
 काही गोष्टी ज्या मला अवघड वाटल्या त्या अशा
१. य चे अक्षर हे  य म्हणून आणि इ , ए आणि ऐ ची मात्रा म्हणून (शब्दाच्या शेवटी) वापरले जाते.
२. व चे अक्षर व म्हणून आणि ओ, उ व औ ची मात्रा म्हणून वापरतात.
३. इसको व उसको हे लिहिल्यावर सारखेच दिसतात. सुरवातीला व मधे येणाऱ्या अक्षरांवरील मात्रांची चिन्हे अनेकदा वगळली जातात. मुझे हे मझे असे लिहिले जाते. तीच गोष्ट जोडाक्षरांची.
४. अरबीतून आलेली अक्षरे भारतीयीकरण केल्यामुळे दोन स, दोन झ वगैरे भानगडी आहेत.


असे सगळे असल्यामुळे अनेक्दा शब्द माहीत नसेल तर वाचणे अवघड जाते. हिंदीतल्या अनेक नटनट्यांची नावे उर्दूत लिहील्यावर कित्येकदा ओळखू येत नाहीत उदा. ऐश्वर्या राय.
पण भाषा ओळखीची असल्याने लिपी शिकायला सोपी गेली. लिहिणे त्यामानाने अवघड असेल असे वाटते.
  भारतात गेल्यावर हे शब्दकोश मिळाले तर पाहतो.