अन्य बाबी सारख्या असतील तर दोन व्यक्तींमधील सुशिक्षित वा उच्चशिक्षित व्यक्ती जास्त सुसंस्कृत व प्रामाणिक असेल असे मला वाटते. शिक्षणाने माणूस जास्त प्रगल्भ होतो. त्याचे/तिचे अनुभवविश्व जास्त समृद्ध होते. लेखन, वाचन ह्या माध्यमातून नवे विचार, नवे विषय कळतात. अशिक्षित व्यक्तीला ही कवाडे बंद असतात.
आजच्या काळात तंत्रज्ञानाला महत्त्व आहे. उच्चशिक्षित माणूस ह्या गोष्टींशी जास्त परिचित असतो आणि तो/ती त्या गोष्टी लवकर आत्मसात करु शकेल.