लोकशाहींत लोकांचे राज्य असल्यामुळे सर्वसामान्य माणूस राज्य करण्यासाठी सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांचे परित्राण (संरक्षण) करणाऱ्या पार्टीपेक्षा लोकांना राज्य करण्यासाठी शारीरिक, मानसिक व बौद्धिक दृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या पार्टीची गरज आहे.