डॉक्टरजींनी (डॉ. हेडगेवारच म्हणायचय ना तुम्हाला?) १९२५ साली संघ स्थापन केला. त्याला आता ऐशी वर्षे व्हायला आली. त्यावेळेस त्यांनी ज्या कारणाने रंगूनला स्थायिक न व्हायचा निर्णय घेतला ती कारणे आज कालबाह्य झाली असतील असे वाटत नाही का आपल्याला?
बाकी वेळोवेळी संघावर दुगाण्या झाडणारी मंडळी सोयीचे असेल तेव्हा संघाच्या नेत्यांचे उद्गार वा वागणुकीचे दाखले देतात तेव्हा कमालीचे मनोरंजन होते खरे.
ज्या भारतीयांनी भारत सोडला आहे त्यांना ह्या देशातून हद्दपार करावे, पुन्हा त्यांना भारतात पाऊल ठेवु देऊ नये, आल्यास तुरुंगात डांबावे अशी आपली भूमिका आहे का? तसे केल्याने भारताचा फायदा होईल असे आपल्याला वाटते का?
की भारतातील कुठल्याही गोष्टीवर टीका करायचा त्यांना अधिकार नाही अशी आपली भूमिका आहे? तसे केल्याने भारतातील तमाम सरकारी हापिसे सुरळित चालू लागतील काय? मुळात समस्त सरकारी कारभार हा दृष्ट लागेल इतका व्यवस्थित आहे का?