परदेशी भूमिच्या कार्याय बद्ध कटियम असलेल्या बिचार्‍या कंबरमोड करून घेणार्‍या 'हिन्दू स्वयंसेवकांपेक्षा' सकाळी ७ च्या आत घरात पेपर फ़ेकून "घे, वाच ह्या बातम्या" म्हणणारे केतकर आम्हाला अधिक जवळचे वाटतात! आणि का नसावे? आमच्या देशात पोस्ट असे काम करते, रेल्वे अशी आहे, हे सकाळी सकाळी ७.३९ ची डोम्बिवली - दादर पकडणाराला ऐकवल्यानंतर पोटात गुदगुल्या होतील की पोटशूळ होईल हे समजाऊन सांगा. अश्या वेळी ४-२ लोक स्वाभिमानाने (हेकटपणाने म्हणा हवे तर) उंटावरच्या विद्वानांना म्हणाले की "आम्ही आमचे पाहून घेऊ" तर चुकले कुठे?

आमचे दात कोरून पोट भरणारे  सरकार 'अडल्या हरी' सारखे डम-डम दवंडी पिटवून देता का रे आम्हाला कोणी डॉलर, दीनार, पाऊंड म्हणून ओरडते... त्याहून आमच्या सारखे 'कर्तबगार' त्या सरकारवर अशी वेळ आणून देतात, हे त्या भारतमातेचे दुर्देव दुसरे काय?

आणि हा झाला व्यावसायिकतेचा भाग, परदेशी नागरिक जेव्हा गुंतवतात तेव्हा हा किती सुंदर आणि महान देश आहे हे पाहून गुंतवत नाहीत... स्वतःच्या देशापेक्षा ४-२% जास्त मिळतात म्हणून गुंतवतात... हेच लोक गुजरात सारखे कुठे काही खुट्ट झाले की तेवढे च्या तेवढे पैसे जमेल तितक्या लवकर ट्रांसफ़र करून घेतात! तिथे कोणी स्वयंसेवक नसतो की कोणी सेवादलाचा कार्यकर्ता...

त्यामुळे "लेट्स टॉक बिझीनेस" ही भाषा काय वाईट आहे?