अनु,

लेख छान आहे.

१.  रोजच्या रोज ताजी भाजी जमिनीवर बसून चिरणे.
२.  रोजच्या रोज कणिक जमिनीवर बसून भिजवणे.
३.  जमिनीवर बसून जेवणे.
४.  रोजच्या रोज बाहेर फिरायला जायला जमले नाही तरी जेवल्यानंतर घरातल्या घरात फेऱ्या मारणे किंवा घराच्या बाहेरील आवारात फेऱ्या मारणे.

५.  जमिनीवर बसून ताक घुसळणे. 

सर्वात महत्वाचे म्हणजे सूर्यनमस्कार घालणे. १२ जमले नाही तरी किमान १ नमस्कार घालता येणे अगदी सहज शक्य आहे. त्याला वेळेचे बंधन नाही. अगदी रात्री झोपायच्या आधी जरी घातले तरी काही बिघडत नाही. सूर्यनमस्कारात सर्व प्रकारच्या हालचाली होतात. हात वर करणे, जमिनीवर टेकवणे, पाय पुढे मागे करणे, वर बघणे, जमिनीवर डोके टेकवणे,  खाली वाकणे. सर्व काही. आणि अगदी थोड्या वेळात. लाख दुखोंकी एक दवा.

रोहिणी