अनु, मस्त झालाय लेख!
त्यातल्या त्यात खळखळून हसण्याचा उपाय मला मनापासून पटला. तुला गंमत सांगते... काल एक बिल्ड अचानक रद्द झाल्यामुळे आमचा सगळा संघ निवांत गप्पा मारत बसलो होतो. जवळजवळ ८-९ महिन्यांनी सगळे एकत्र होते आणि सगळे हसत होते. शेवटी हास्यविनोद करताना ज्याला इंग्रजीत फ्रीक आऊट होणे म्हणतात तो प्रकार झाला. त्या मुक्त हास्याचा परिणाम काल रात्री दिसला. मला अनेक वर्षांनी इतकी प्रसन्न झोप लागली आणि जागही छान आली.
तू सांगितलेले बाकी उपाय सुद्धा विचार करण्यासारखेच आहेत. त्यातले काही मी स्वतःही वापरते. हे सगळं इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.
--अदिती