शेअर विकत घेण्याचे प्रकार - १)प्राथमिक लोक विक्री - एखाद्या कंपनीचे प्राथमिक समभाग (पहिले शेअर) ती कंपनी जेव्हा विक्रीस काढते तेंव्हा लोकांना सरळ विक्री करते. यात कंपनी काही ठराविक शेअर्स घोषित करते. आणि तिचा भाव सुद्धा घोषित करते. आता नवीन पद्धतीत कंपनी भाव न ठरवता एक मूल्यकक्षा घोषित करते. म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव. कंपनीच्या शेअर्सना असलेल्या मागणी वर त्या शेअर्सचे मूल्य ठरते.
२) दुय्यम शेअर बाजार - खरंतर हाच आपला शेअर बाजार जेथे आधी कुणी तरी घेतलेले समभाग आपण विकत घेत असतो. या बाजारात खरी उलाढाल होत असते. जेव्हा कंपनीचे शेअर्स प्राथमिक विक्री होतात (IPO)तेंव्हा ती कंपनी शेअर बाजारावर अधिकृत होते आणि त्या कंपनीचे शेअर्स बाजारात पुर्नविक्रीसाठी उपलब्ध होतात.येथे जो कुणी हे शेअर्स घेण्यास उत्सुक असतो तो ते शेअर्स घेऊ शकतो. मात्र येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे की ही खरेदी -विक्री व्यक्ती परस्पर करू शकत नाहीत, तर हे व्यवहार शेअर बाजाराची अधिकृत मान्यता असलेल्या दलालाच्या माध्यमातूनच करावे असा नियम आहे.