जीवनशैलीत अचानक आमूलाग्र बदल आवश्यक बनतो. कळतं, पण वळत नाही, अशी परिस्थिती खरंच निर्माण होते. स्वतःची समजूत घालायची एक सोपी पद्धत अशी की, असा विचार करावा, ह्या (आजच्या) वयात मी गोट्या, विटीदांडू, भोवरा खेळतो का? तर नाही. ते वय आता राहिले नाही. ज्या वयात ह्या खेळांचा आनंद उपभोगायचा त्या वयात तो उपभोगिला. समाधानी असावं. तसेच, तरूण वयात सर्व मौजमजा केली. समाधान आहे. आता काही पथ्य पाळावीत. रोज चालण्याचा व्यायाम, सूर्यनमस्कार, संतुलित आणि मित आहार ह्याची सवय करून घ्यावी. महिन्यातून एक दिवस मौजमजेचा (खाण्या-पिण्याचा, व्यायाम न करण्याचा) ठेवावा. हळू-हळू नवीन जीवनशैली अंगवळणी पडते. मनाची बंडखोरी कमजोर पडू लागते.

हे सर्व, ५०+ वयोगटासाठी आहे. ज्यांचे मौजमजेचे दिवस अजून चालू आहेत त्यांनी वेगळा विचार करण्यास हरकत नाही. परंतु, परिस्थिती हाता बाहेर जाणार नाही इकडे लक्ष द्यावे. ही विनंती.