माफ़ करा माझ्या दोन चुका झाल्या. एक तर पुण्यात कुठेही "येथे अमृततुल्य चहा मिळेल" अशी पाटी लावलेली नसते, तर "येथे अमृततुल्य मिळेल" अशीच पाटी असते
प्रथम पुण्यात गेले तेव्हा हा नवा प्रकार ट्राय करुया म्हणून मैत्रिणीसाठी एक चहा आणि माझ्यासाठी एक "अमृततुल्य" मागवले. कोण या अजाण बालिका असा चेहरा करुन चहावाला म्हणाला "आम्ही चहा विकत नाही" मग आम्ही दोन अमृततुल्य मागवले. आणि चहावाला कपात चहाच ओतताना बघुन कळले अरे हे "अमृततुल्य" म्हणजे "स्पेशल चहा"
असो.
साती काळे
ता.क. -कोहं मी पुण्यातील चुकही इथे बदलली बरं!