गांधीजी असते तर त्यांनी प्रशासक (पुनरावृत्ती टाळावी) आणि शरदराव (वस्तुनिष्ट विचार मांडावेत) या दोहोंच्याही विचारातील सूत्र अचूक मांडले असते -- हे असे
----------------------------------------------

(प्रशासकांची पुस्ती :

अतिचर्चित, अतिचर्वित असे मुद्दे निवृत्त आणि वर्ज्य केल्यास मनोगत सर्वांसाठीच अधिक सुलभ, उपयुक्त आणि सुंदर होईल. प्रशासक या नात्याने असे वातावरण राखण्याची मोठी जबाबदारी (आणि क्षमताही) आमच्यावर आहे.

आपला प्रतिसाद देण्यापूर्वी कृपया या चर्चा नजरेखालून घालाव्यात - आणि यांत भर घालण्यासारखे विचार असल्यास मांडावेत...
१. "हिंसक" महात्मा गांधी
२. फाळणीचा इतिहास
३. गांधी...महामानवाचे ओझे???

तरीही येथे पुनरावृत्ती आढळल्यास ते काढून टाकण्याचे काम करावेच लागेल. हा विचारस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रकार नाही... कारण तशी मानसिकताच नाही.
सहकार्याची अपेक्षा!
----------------------------------------------

एकलव्य उवाच - प्रशासक महोदय, आपण एकदा विचार मांडल्यावर त्यांत किंचितही बदल करीत नाही, असा इतिहास आहे. भावना त्याच ठेवून शब्द बदलल्यास कमीपणा येणार नाही... उलट आदर वाढेलच.