मित्रानो , मालवणी ही कोकणीचे एक अंग आणि मायबोली मराठीचे लेकरू.

   काय झाले , तात्या गावकरांकडे सुनेच्या माहेरचे पाहुणे आले होते कोल्हापूरहून . गप्पा चालु असताना तात्यांच्या सौ. बनुताई सूनेला म्हणाल्या , अगो भिमल्या , आता हेंका चाय आणि डब्यात चकली , भिस्किटा आसत ,ती सोमतीच हाड . सोमती म्हणजे काय हे त्या नविन कोल्हापुरी वळणाच्या सुनेला समजेना. ती आतूनच म्हणाली , आईसाहेब , डब्यात चकली , बिस्किटस सापडली पण 'सोमतीच हाड ' कुठे आहे ?

     तात्या आणि  बनुताईना हसू आवरेना . पाहुणेही अचंबित. त्यानाही काही समजेना .

 खुलासा झाल्यावर सर्वजण आण्खी हसू लागले. मालवणीत सोमते , सोमती , सोमतेच म्हणजे मराठी जे आपण " सह , बरोबर या अर्थाने व्यक्त  करतो तसा अर्थ. आणि हाड म्हणजे आण  / घेऊन ये .

 [ यापुढे विनोदवीर तात्यासाहेब देवगडकर आपले गाठोडे उघडतील अशी अपेक्षा .]