प्रसन्न,
गझल आवडली. "खेळुनी झाले पुरे आयुष्य माझे, ये अरे मृत्यो ! तुलाही डाव देतो " या ओळी वाचताना सोलापूर येथील एक कवी कै.रा. ना. पवार यांच्या "जीवनाचे शिल्प " कवितेची आठवण झाली. ते मृत्यूसंदर्भात लिहितात,
"काय माझा पाहूणा पाठवू मी परक्या घरी,
मीठ-भाकर प्रीतीने खाईल तो माझ्या घरी "
तुमची कविता आवडली . अभिनंदन.
अवधूत.