पुणेरी पाट्या आता पूर्वीइतक्या शुद्ध नसतात. काही काळापूर्वी मी शनिवार वाड्याजवळ "आ"मृततुल्य चहाचे "हो"टेल पाहिले होते. ("आमृत" शब्दाचा अर्थ काय लावावा?) पुण्यात आता  उ"स"चा ("सा"चा नव्हे) रसही मिळतो. रेडीमेड "कापडाचे"(कापड रेडीमेडच असणार ना!) दुकानही आहे. शोधले तर अजून काही सापडेल; पण नको,आम्हांला रहायचेय इथे.