धन्य ते किशोर मासिक! आता आहे की नाही कोणास ठाऊक!

किशोर मासिक अजूनही आहे.  मी दिवाळी अंक पाहिला आहे त्याचा.  किशोर मध्ये चित्रकोडी येत, ती सुद्धा फ़ारच छान असत. किशोर वगळता इतरत्र चित्रकोडी पाहिल्याचे मला तरी आठवत नाही.

मी लहानपणी 'धाडसी चंदू' नावाचे एक पुस्तक वाचले होते.  मार्क ट्वेनच्या टॉम सॉयर चे ते मराठी भाषांतर होते.  त्याचे लेखक कोण ते कळू शकेल का? मी काल दादर ला आयडियल मध्ये चवकशी केली पण लेखक माहीत नसल्याने मिळू शकले नाही.

साती- खुप छान उपक्रम आहे तुमचा. मी मुलीसाठी छापून नेते लेख, आला की (print).  जरा लौकर येऊ द्या पुढचे भाग.  मुलीला पण आता उत्सुकता लागलीय पुढचे भाग वाचायची.

साधना.