मला ह्या बाबतीत चिनी लोकांचे कौतुक वाटते. चिनी लोक जगभर गेले पण मला नाही वाटत की तिथे असे मुद्दे कोणाच्या डोक्यातही येत असतिल. हे बाहेर गेलेले चिनी आज चिनच्या प्रगतीत मोलाची भर टाकत आहेत.
इतके लांब कशाला जा? आपल्या भारतातील मल्याळीच बघा. जगभर गेले पण त्यांना कोणी परके नाही मानत. उलट, त्यांच्या साठी एक स्वतंत्र मंत्री आहे सरकार मधे. (केतकरांचे आवडते साम्यवादी पण आहेत अ-निवासी मल्याळींमधे).
फ़क्त महाराष्ट्रातच हा मुद्दा चविष्ट पणे चघळला जातो. आपण तसे ही इतर भारतियांमधे निष्क्रिय, बावळट आणि दुरभिमानी म्हणून प्रसिध्द आहोतच.
केतकरांबद्दलच बोलायचे तर जागा कमी पडेल. त्याना नक्कीच बरेच पोटशूळ आहेत. आणि काही गोष्टी नजरेआड करायची पण सवय आहे. ते स्वत: इंदिरा भक्त आहेत. त्यांना बहुतेक बाकी सगळे मूर्ख वाटतात (साम्यवादी सोडून).