माझ्या या प्रतिसादातून उद्धृत-

मंगल कार्यात धार्मिक विधी करताना डावा हात वापरला जात नाही. तसेच पती मंगल कार्यातले सगळे धार्मिक विधी उजव्या हाताने करतो तर पत्नी त्याच्या हाताला हात लावून बसते. सोयीचे जावे म्हणून ती त्याच्या उजव्या बाजूला बसते.

यावरून 'उजवले जाणे' किंवा 'उजवणे' आले असावे असे वाटते. अर्थात 'कूस उजवणे' मधले 'उजवणे' हे तेच 'उजवणे' आहे का वेगळे ते माहीत नाही. तज्ज्ञ अधिक प्रकाश पाडू शकतील असे वाटते.