वेगळा आणि रंजक लेख आहे. उदाहरणांमुळे अधिकच मजा येते आणि मुद्दे पटतात.
रेडिओची एरियल ओढत ओढत जश्या एकातून एक कांड्या बाहेर येत येत एरियलची लांबी वाढत जाते त्याप्रमाणे शालिनीपासून सुरुवात करून स्रग्धरेपर्यंत पोहोचलो.
उर्दूतही अशीच एरियल ओढतात. लघूला उर्दू छंदशास्त्रात वतद आणि गुरूला सबब म्हणतात, असे आठवते. पण वतद आणि सबबचे बरेच पोटप्रकार आहेत.
उर्दूतील छंदाधारित मुक्तछंदात असेच कमी जास्त लांबीचे एरियल असतात. एक स्वरचित उदा.
तुम्हारे गेसूं घनेरे गेसूं
मफाइलातुन, मफाइलातुन
तुम्हारे गेसूं दराज़ गेसूं
मफाइलातुन, मफाइलातुन
के जैसे अपने गुदाज़ शानों पे रात लेकर सबा चली है
मफाइलातुन, मफाइलातुन, मफाइलातुन, मफाइलातुन
सुबह-सवेरे
मफाइलातुन
मफाइलातुन म्हणजे मराठीतले जनास गागा
चित्तरंजन