कुल -- आपले व्यक्तिचित्रण सुरेखच आहे. बारकावे छानच टिपले आहेत.

लहानपणी आमच्या वाड्यात एक कंडक्टर रहात होते. त्यांचे भारीच कौतुक आणि हेवा वाटायचा... रोज गावोगावी यांना फिरायला मिळते...

नंतर काही गोष्टी कळल्या --
यांचे पगार खूपच कमी असतात.
चालकांना बाहेर नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध असतात... पण वाहकांना तशी मागणी नाहीच. त्यामुळे वाहकांची त्याच खात्यात (S.T.) राहून चालक होण्याची धडपड असते.
तिकिटे आणि पैश्याबाबत सर्व प्रवाश्यांना तिकिट मिळाले तर उत्तम; पण त्याहीपेक्षा अधिक कटाक्ष जितकी तिकिटे देणार तितके पैसे येतात की नाही यांवर अधिक. नाहीतर स्वतःच्या खिशाला चाट!
शासकीय खाते असूनही खाण्याला फारशी संधी नाही अशीही रड असायची.

....