खर म्हणजे आरक्षणाला मुळापासून विरोध करने चुकीचे आहे.

आजदेखील ब्राम्हण म्हटले की "सुशिक्षित, आई वडिल नोकरीला (बहुधा MNC मध्ये) , कोणीतरी नातेवाइक परदेशी " असं काहिसं चित्र उभ राहत.

मराठा म्हटल की "सुशिक्षित, गावी मोठी बागाईत, कोणीतरी नातेवाइक राजकारणात".

असं काही कैकाडी, वडारी, पारधी........ यांच्याबाबतीत दिसत नाही.

बर यांच्याबरोब निकोप स्पर्धा करण्याची तुमची तयारी आहे. धन्य.
या लोकांपुढे शिक्षण का घ्यावे हा प्रश्न असतो तिथे तुम्ही त्यांना कर्ज घेउन शिकण्याचे सल्ले देता. धन्य.

५० वर्षांनंतर आरक्षण दिलेल्या लोकांची काय स्थिती काय आहे, त्यांना त्याचा लाभ झालाय का? नसेल तर का झाल नाही? अजूनही त्यांना खरच गरज आहे का? याचा तुम्ही अभ्यास केलाय का?