इंदूरकडे बोलताना अशीच दोन क्रियापदे वापरण्याची पद्‍धत आहे त्यामुळे नव्या माणसाला जरा खटकतं आणि कधिकधी हसू देखिल येतं मला अमकी वस्तू देऊन दे, ‍घेऊन घे आणि पून्हा तेच करुन राहिलीए, जाऊन राहिलीए, बोलून राहिलीए ( आता काय बोलायची राहिलीए!!) गुजराती मराठीत तर चक्क - जात राहिलीए ( जाते आहे की राहिली आहे कळायला काही मार्ग नाही), आणत राहिलीए ( आणते आहे यासाठी) वगैरे एकूणच सहाय्यक क्रियापदाचा वापर अधिक केल्याने किंवा द्विरुक्तीमुळे प्रत्येक प्रांतात असे भाषिक विनोद तयार होतचं असतात. ...... आणखी वाचायला आवडतील.