डेक्कन कडून आ.गरवारे कॉलेज कडे जाताना, चव्हाण पूलानंतर आणि कॉलेजच्या कुंपणाच्या अलिकडे एका इराणी चहाचे दुकान आहे. त्याच्या चहाची चव अमृततुल्यापेक्षा खूप वेगळी आहे.  

गरवारेच्या वसतिगृहात असताना त्या चहा आणि त्याच्या कडच्या मस्का बन चे अक्षरशः व्यसन लागले होते. आमचे मित्र 'तो ऊंटीणीचे दुध वापरतो' असे मजेने म्हणत. नंतर समजले की तो कंडेंन्सड दुधाचा चहा बनवायचा ते ..... तिथेच समोर, रस्त्याच्या दुसर्या बाजूला प्रभाकर बेकरी आहे, अगदी छोटीशी टपरी ... पण त्याच्या कडे अंडाबन अफ़लातून मिळते.