मागास लोकांना सवलत देण्यामागे उद्देश भलेही चांगला असेल. पण मानवी स्वभाव बघता आणि आपल्या भारतातील लोकशाहीची लायकी बघता खालील मुद्द्यांचे काय करायचे?

१. पिढ्यान् पिढ्या ह्या सवलती वापरुन गब्बर झालेले आणि समृद्ध झालेले लोक बिनदिक्कत ह्या सवलतींचा केवळ जातीच्या जोरावर फायदा घेतात. मला अशी कैक उदाहरणे माहित आहेत. हे लोक आपली कमी गुणवत्ता असूनही उच्चशिक्षण, शिष्यवृत्या लाटतात तसेच खरोखरच्या लायक उमेदवारांना ह्या सवलतींचा लाभ मिळवणे अवघड बनवतात. उदा. आय आय टीच्या परीक्षेत शेकडो निव्वळ कागदोपत्री मागास असणारी मुले बसत असतील तर खरोखरच गरीब, अशिक्षित घरातील मुलांना त्या गुणवत्ता यादीत येणे अवघड जाईल.

२. राजकारणी लोक मते मिळवण्याचा सवंग उपाय म्हणून अशा लोकांच्या राखीव जागा उत्तरोत्तर वाढवतात. मुळात हा एक तात्पुरता उपाय असल्याचे वारंवार सांगितले जात होते पण मताच्या लोभाने बंद करणे सोडाच पण जासतीत  जास्त सिटा राखीव कराव्यात असे पुढाऱ्यांना वाटते आणि टीकेच्या भीतीने विरोधी पक्षही ह्याला विरोध करत नाहीत. हे अत्यंत गैर आणि घातक आहे.
 वरील दोन्ही घटनांमुळे मागास वर्गातील लोकांबद्दल सामान्य लोकांचा रोष वाढतो आहे.