१९५८ सालच्या एस. एस‌. सी. साठी असलेल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांत शिवाजी महाराजांनी आपल्या भावाला, व्यंकोजी राजांना लिहिलेल्या पत्राचा मायना आठवतो तो असा -

"सकल गुणालंकृत, राजश्रिया विराजित, राजमान्य राजश्री, व्यकोजी राजेप्रति..."

गंमत म्हणजे सदर पत्रांत शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजांना मायन्यांत "सकलगुणालंकृत" म्हणून गौरवून (हे संबोधन महाराजांनी उपरोधाने वापरले नसावे असे वाटते) पुढील मजकुरांत त्यांची कडक शब्दांत निर्भर्त्सना केली आहे.