उतारे-इयत्ता अगदी नेमके म्हणून आठवत नाही आहेत, पण त्या कथा/लेख अगदी मनात घर करून आहेत. तरी प्रयत्न करून बघतेय..

'सोन्यासाठी भीमाने सोन्यासारखा हात गमावला होता.'

- स्मशानातील सोने. इयत्ता दहावी.

'कु...कू...कूक.. आणि रेडिओतून येणारा आवाज बंद झाला.' (मदतीसाठी हाक देणाऱ्या त्या बुडणाऱ्या जहाजातले ते शेकडो जीव बुडाले की काय? या विचारासरशी धस्स व्हायचं काळजात या वाक्याने. )

- रेडिओची गोष्ट. ( अभ्यासक्रमातून गाळलेला परंतू माझा अत्यंत आवडता धडा. ) इयत्ता दहावी.

..आणि सगळीकडे लाल चिखल झाला होता. ( इथे 'लाल' या शब्दावर कोटी आहे. खूप जीवघेणी आहे ती. आजही खूप खोलवर जाऊन रुततात ते शब्द. शहारून येतं त्या विचारानेही. )

- लाल चिखल. इयत्ता दहावी.

.. उपरण्याला या गाठी मी का मारल्या होत्या?

- विसरभोळा गोकुळ. इयत्ता चौथी. 

बिनसाखरेचा, बिनदुधाचाच नाही तर बिनचहाचा चहा मी पिऊ लागलो !

- उपास. इयत्ता नववी की दहावी?

ढिगभर गोष्टींसाठी विचारपूस करून काहीही न घेता मी त्या दुकानातून सहीसलामत बाहेर पडलो !

- बाजार. इयत्ता - आठवी ( बहुतेक )

शिंतूला वृक्षदेवतेकडून अमाप धन मिळाले म्हणून लिंतूने वनात जाऊन त्या झाडाच्या फांद्या सपाऽस्सप तोडल्या आणि मायेचा पुळका आणत स्वतःचा सदरा फाडून झाडाला यामुळे झालेल्या जखमा बांधल्या.

- शिंतू आणि लिंतू. इयत्ता - पहिली/दुसरी की तिसरी आठवत नाही.

काम करायला माणसं नाहीत असं म्हणणारी अनेक माणसं दिसतात.

- विसंच्या एका लघुनिबंधातलं वाक्य आहे हे बहुदा. नाव आठवेना आणि इयत्ताही.