आमच्या काळी मराठी माध्यमाच्या बहुधा इयत्ता दहावीच्या (नक्की इयत्ता आठवत नाही - चूभूद्याघ्या!) इतिहासाच्या पुस्तकात फ्रेंच राज्यक्रांतीबद्दलच्या धड्यात मारी आंत्वानेतचा तो "If they don't have bread, let them eat cake!"वाला सुप्रसिद्ध (की कुप्रसिद्ध?) प्रसंग, त्यातले संवाद मराठीत भाषांतरित करून रंगवला होता. त्यात भुकेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा राजवाड्यासमोर "भूक! भूक! भाकरी द्या!" म्हणून ओरडत निदर्शने करीत असतो, त्याला मारी आंत्वानेत "चटणी-भाकरी मिळत नसेल, तर शिरापुरी खा!" असे उर्मट उत्तर देते.

बाकी काहीही होवो, या भाषांतरामुळे धोतरमुंडाशातले फ्रेंच शेतकरी मात्र डोळ्यासमोर हुबेहूब उभे राहिले होते! :-)

- टग्या.

ता.क.: उपरोद्धृत इंग्रजी वाक्य हेही मूळ फ्रेंच वाक्याचे थोडेसे स्वैरच (आणि तितकेसे अचूकही नसलेले) भाषांतर आहे, असे म्हणतात, त्यामुळे मराठीत आपण आणखी एक पाऊल पुढे गेलो, तर बिघडले कुठे?