पिढ्यान् पिढ्या हा शब्दप्रयोग चुकला पण मूळ मुद्दा चुकीचा नाही. एका पिढीने ह्या सवलती वापरुन आपले उत्थान करुन घेतले की त्यांच्या पुढच्या पिढीने तो फायदा घेणे अत्यंत गैर आहे. उदा. वडिल कोटा वापरुन आय आय टीत शिरले तिथले फायदे वापरुन शिकून चांगली नोकरी मिळवली. अशा घरातील मुलाने पुन्हा ही सवलत उपटणे सर्वथा गैर आहे.
जेव्हा ही सवलत दिली जाते तेव्हा काबाडकष्ट करुन, तुटपुंजी पुस्तके, साधने वापरुन शिकणारे विद्यार्थी ती सवलत घेणे अपेक्षित आहे. अन्य पुढारलेल्या कुटुंबाप्रमाणे सुखवस्तू जीवन जगणारे नाही. अशाने लायक मुलांचा हक्क हिरावला जातो याची जाणीव आहे का आपणास?
 

चांगला उपाय म्हणजे एका पिढीलाच हे आरक्षण उपलब्ध करायचे. नंतर वापरायला बंदी घालायची. आणि जातीबरोबर आर्थिक निकषही लावावेत. दुसरे असे की विशिष्ट टक्क्यापेक्षा जास्त राखीव जागा असू नयेत असा कायदा बनवला पाहिजे. नाहीतर "वरवर विचार करणाऱ्या" बहुसंख्य लोकांच्या रोषाचा कडेलोट होऊन मंडल कमीशनसारख्या दंगली होतील.