चित्तरंजन महाशय, हा लेख निदर्शनास आणल्याखातर धन्यवाद.

गणितासारख्या रुक्ष विषयास लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या प्रयासाखातर, मीरा फाटक ह्यांचे अभिनंदन.

सकाळच्या लेखात आकृती दिसली नाही पण समजून येते.
शेवटले कळीचे वाक्य 'मे आय हॅव अ लार्ज कंटेनर ऑफ कॉफी' असे असावयास हवे होते. हेही समजून येते.

मी मात्र 'पाय म्हणजे काय?' हा प्रश्न अनेकांना, अनेकदा विचारत असे. आणि मग उत्तरही देत असे की, 'पाय म्हणजे जगात कुठल्याही प्रतलावर, कितीही आकाराचे वर्तुळ, कधीही काढले तरी त्याच्या परीघ व व्यासाचे गुणोत्तर एकच संख्या येते तिला पाय म्हणतात'.