किशोर मध्ये चित्रकोडी येत, ती सुद्धा फ़ारच छान असत. किशोर वगळता इतरत्र चित्रकोडी पाहिल्याचे मला तरी आठवत नाही.
'किशोर'मधील चित्रकोड्याच्या त्या सदराचे नाव 'चित्रबोध शब्दशोध' असल्याचे स्मरते.
मी लहानपणी 'धाडसी चंदू' नावाचे एक पुस्तक वाचले होते. मार्क ट्वेनच्या टॉम सॉयर चे ते मराठी भाषांतर होते. त्याचे लेखक कोण ते कळू शकेल का? मी काल दादर ला आयडियल मध्ये चवकशी केली पण लेखक माहीत नसल्याने मिळू शकले नाही.
मी लहानपणी वाचलेल्या टॉम सॉयरच्या (स्वैर) मराठी भाषांतराचे नाव 'चिंटू' की 'पिंटू' असे काहीसे असल्याचे स्मरते. (नक्की आठवत नाही. बहुधा 'पिंटू' असावे, असे वाटते.) लेखक आठवत नाही.
तसेच लहानपणी 'डॉ. डूलिट्ल'चे 'डॉ. करमरकर' नावाचे मराठी भाषांतरही वाचल्याचे आठवते. चांगले होते. त्याचेही लेखक आठवत नाहीत, पण बहुधा 'प्रेस्टिज प्रकाशना'ने प्रकाशित केले होते. कारण 'प्रेस्टिज प्रकाशना'च्याच 'बिरबल' नामक बालमासिकातसुद्धा ते क्रमशः प्रसिद्ध झाले होते.
- टग्या.