मिलिंदराव,
कवीने काहिही लिहावे, पण त्यातल्या भावना जर उमजल्या नाहीत तर ते "अरण्यरूदन" झाले नाहीका?
माननीय प्रवासी हे अतिशय हुशार आणि ज्ञानी आहेत. त्यांनाहि त्या कवितेतला भाव कळला नसेल तर इतर अनभिज्ञ लोकांची तर काय अवस्था झाली असेल.
आपण मोकळेपणाने जर कवितेचा अर्थ उलगडून दाखवलात तर ते (प्रवासींसकट) खूप जणांना आवडेल असे मला वाटते.
मला स्वतःला
"कैद खगास....
"मुक्त जगीन....
"शिस्त बरी.........
"सांग जरा उनाड....
या ४ कडव्यांचा साधारण भाव समजला. परिस्थितीची बंधने स्वच्छंद आणि स्वतंत्र वागून देत नाहीत असे काहिसे वाटले. त्या पार्श्वभूमिवरून बाकीच्या ३ कडव्यांचा अर्थ शोधायचा प्रयत्न मी केला आणि ते अजिबात जमले नाही. प्रवासींनी ही शंका मोकळेपणी मांडली त्यामुळे आपल्याला लिहायला मला धीर आला.
माझा प्रतिसाद आपल्याला न आवडल्यास मला "दुर्दैव" वाटणार नाही .
कलोअ,
(काव्यात लंगडा) सुभाष